Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

5/7/12

रोखठोक

 तू म्हणतोस भावनेच्या भरात वाहून जाऊ नकोस. छेरे, असलं काहीसुध्धा होत नाही मला.
भावनेच्या भरात वाहून जाणे असल्या वायफळ गोष्टी पटत नाहीत बुवा आपल्याला.
माझा सगळा  रोखठोक कारभार.
हो, आता ही गोष्ट वेगळी की तुझं नाव घेताना कधीमधी काळजाचा एखादा कोपरा थरथरतो..
पण त्यात काय एव्हढसं..
हो आणि तुझी आठवण आली ना की माझं अस्तित्व हवेत विरघळणाऱ्या कापरासारखं अलगद विरून जातं कणाकणाने अन क्षणाक्षणाने.
तुझ्यापर्यंत पोहोचणं कदापीही शक्य नसतं मला;
तरीही तुझा अगम्य स्पर्श जाणवतो मला मोरपिसा सारखा हळूवार,
त्या मायाळू  स्पर्शाच्या साक्षीनं उमलून येतं माझं अवघं जिवंतपण...!!
बास्स..इतकंच होतं कधीमधी..
पहारा चुकवून एव्हढेच काय ते भावविभोर क्षण करतात प्रवेश मनाच्या ओल्या  मातीत..
इतर वेळी असतेच मी भावरहित कोरडी..