पुरूष नेहमी पुरूषच असतो
दारू पिणारा,
शिवीगाळ मारपिट करणारा
बिड्या फुंकणारा ,
नपुंसक असला तरीही..
पत्ते कुटत,
बायकोच्या पैशावर मजा मारणारा
गावभर उकिरडे फुंकणारा
पुरूषच असतो !!
पुरूष नेहमी पुरूषच असतो
फार फार तर मर्द म्हणवतो
स्त्री ?
ती कधी बाईमाणूसही म्हणवते
नाहीच असे नाही
बर्याचदा
जेवणात मीठ कमी पडले
तर ती हराम होते
पुरूषाने ठेवली की
रखेल होते
मूल न देऊ शकणारी
वांझोटी असते
कधी वेश्या असते
आणि नवर्याने टाकून दिली तर
गावजेवण होते
दुर्गा म्हणतात कधीकधी तिला
पण ती पुराणातच परवडते सार्यांना
जिवंत जाळली जाते सहजच
हलक्या चारित्र्याची म्हणून
किंवा भोगली जाते
तिच्या मर्जीविरूद्ध
बंद दाराआड
किंवा उघड्यावरच
ती छिनाल असते
पुरूषाला जाळ्यात फसवणारी
ती रांड असते
अशी तशी ती कोणकोण असते
फक्त माणूस तेवढी नसते
Not always true
ReplyDeleteपुरुषाला वाईट म्हणत नाहीये मी या कविते मधे. समाजाच्या स्त्री व पुरुषांना वेगळ्या प्रकारे दर्जा देण्याच्या भेदभावाबद्दल चीड आहे.
ReplyDelete