कधी कधी असे वाटते की आपल्या जवळच्या माणसांच्या हातात normality चे scale आहे.. ते सतत एक स्केल हातात घेऊन उभे असतात आपल्याला तोलत.. त्याची २ टोके म्हणजे minimum आणि maximum .. त्यावर सतत तोलत, जोखत राहतात इतरांना.. सतत नियंत्रण ठेवू पाहतात. इतरांनी कसे बोलावे, वागावे, विचार करावा हे तेच ठरवणार.. इतर लोकांनी त्यांच्या स्केल वर कायम maximum च्या टोकाला पाहिजे असा त्यांचा अट्टाहास.. इतर लोक कसे आहेत हे त्यांना कधी समजून घ्यायचेच नसते, जणूकाही इतरांच्या मनाशी त्यांना काही देणेघेणेच नसते.. असे लोक इतरांमधील केवळ कमीपणा, दोष, चुका शोधत राहतात आणि त्यानुसार इतर लोकांना बदलू पाहतात.. एखादे model design करावे तसा त्यांचा माणूस त्यांना हवा तसा design करण्याचा प्रयत्न..!! मग त्यात इतरांच्या स्वतंत्र वृत्तीचा, वेगळ्या विचारांचा, स्वप्नांचा बळी गेला तरी चालते, rather तेच त्यांना हवे असते...
नाही आवडत मला हे..असं कोणी इतरांच्या आयुष्यावर आक्रमण केलेले..खरेतर कोणालाच नाही आवडतं.. अशा लोकांच्या सहवासात जीव गुदमरतो.. त्यांच्या सतत judge करण्याचा त्रास होतो इतरांना..
प्रत्येक माणूस वेगळा आणि स्वतंत्र असतो.. त्याला तसंच जगू दयावं सर्वांनी त्याच्या वृत्तीप्रमाणे.. कुठलंही scale न लावता..