निरोप तिचा घेताना
त्यानं दिलं एक रोपटं
आणि सांगितलं तिला
या रोपट्याला पहिलं फूल
येण्याआधीच मी येईन
तो नजरेआड होईपर्यंत
ती बसून राहिली
दारातील पायरीवर..
चुकून जर तुम्ही
गेलात तिच्या घराकडे
तर दिसेल ती तशीच
पायरीवर बसलेली
आणि पायाशी तिच्या
पडला असेल
सुकलेल्या फुलांचा सडा..!
सध्या शब्दात प्रभावी कविता
ReplyDeletethank u ...
ReplyDeletena bolta khup kahi boln
ReplyDeleteDhanyawad !
ReplyDelete