"तुझा खरंखुरं प्रेम आहे ना रे माझ्यावर? "
" माणसानं साऱ्याच तत्वांमध्ये, मूलभूत प्रेरणामध्ये मोठी भेसळ करून ठेवलीये; सगळं कसं अगदी नासवून टाकलंय."
" का रे बाबा, आणि हे मधेच काय..? "
" बघ ना, प्रेम ही माणसाची मूलभूत प्रेरणा..अगदी आतली. प्रेम म्हणजे प्रेमच ना ? ते खरंच असतं ना, खोटं कसं असतं गं..? पण आजकाल ते आपल्याला कसं व्यक्त करावं लागतं, माझं तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे..!! प्रेमालाही आजकाल खरंखुरं हे विशेषण लावावं लागतं यातच सारं आलं. "
" म्हणजे ? "
" म्हणजे स्वत:च्याच पायांनी स्वत:च्या अधोगतीकडे जायचे आणि वर सुंदर शब्दांचा मुलामा फासून प्रगतीचे ढोंग करायचे. ते ढोंग पकडले जाऊ नये म्हणून बुद्धीचा वापर करायचा.."
" ते जाऊ दे, प्रेम आहे ना..? "
" हो, अगदी खरंखुरं.."
Kharach prem dhsbdanmadhech aadkun basale aahe aaj.
ReplyDeleteHo !!
Delete