शब्दांचे मनोरेच्या मनोरे
बंधू पाहतेय मी
आणि तिकडे तू तर
बसलाय दडी मारून
मौनाच्या खोल डोहात
कसे जुळावेत रे
आपले सूर..?
एकदा केला प्रयत्न
शब्दांचा पूल बांधून
तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा
पायऱ्या होत्या फक्त
तुझ्या आवरणापर्यंत
तेथून आत
तुझ्या काळजात
कशी रे उतरू..?
No comments:
Post a Comment