Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/18/12

अश्रू

कोणी न पाहिले
दोन अश्रू निसटलेले
पापणीवरून ओघळून
काळ्या मातीत रुजलेले
व्हायचे होते मोती 
पण वाट चुकलेले
शिंपल्यानं दगा दिला
मातीनं जवळ केलेले
भाग्य की दुर्भाग्य
त्यांनाच पुसावे
मातीतून उमलून
कणसात फुललेले..!

1 comment: