Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

9/8/12

गोंदवून ठेवेन मी..

गोंदवून ठेवेन मी
तुझ्या हरेक नकाराची
सुबक वळणं
माझ्या मातीच्या पंखांवर
तीच देतील कदाचित
बळ उडण्याचं
पंजांमध्ये घट्ट पकडून
माझेच शव..!
हो, नक्कीच..
गोंदवून ठेवेन मी
तुझ्या तिरस्काराचे
तप्त चांदणे
दवभिजल्या कांतीवर
तेच उद्या फुंकतील
निखाऱ्यांची धग
थंड पडलेल्या देहामध्ये
पुन्हा श्वास घेण्यासाठी..!

No comments:

Post a Comment